News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

पशुधन हिताय, बहुजन सुखाय ब्रीद‘ जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे. पशुधन‘ हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे, यासाठी या विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 89 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य ठरले.

पशुधनाच्या लसीच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पुण्यात 70 कोटी रूपये खर्चून प्रयोगशाळा उभारण्यात आली असून सप्टेंबर 2023 पासून प्रत्यक्ष लसीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. यामुळे महाराष्ट्र देशाला लस पुरविणार आहे. ‘लम्पी” नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. सप्टेंबर 2023 पर्यंत ‘लम्पी‘ लस निर्मिती करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे.