News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक मध्ये 39 तर दिंडोरी साठी 20 उमेदवारांचे अर्ज दाखल.

नाशिक – नाशिक व दिंडोरी येथील जागांसाठी शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे नाशिक लोकसभा जागेसाठी 39 तर दिंडोरी लोकसभा जागेसाठी 20 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपली असून शनिवारी (ता.४) अर्जांची छाननी होणार असून सोमवारी (ता.६) दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेता येणार आहे.

माघारी नंतर नाशिक व दिंडोरी येथील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल