ncp-minority-wing-objects-to-actress-ketaki-chitale-post

मिरज  – वक्फ मंडळाला दिलेल्या निधीविषयी मराठी अभिनेत्री केतळी चितळे हिने केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ‘द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदु-मुसलमान यांच्या भावना भडकावण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, तर संबंधित यंत्रणांनी याची नोंद घ्यावी’, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी म्हटले आहे.

इद्रिस नायकवडी यांनी पुढे म्हटले आहे की, केतकी चितळे हिने निर्णयावर  आक्षेप घेत स्वत:ची विकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वक्फ मंडळाचे एकच कार्यालय राज्यात आहे. त्यामुळे या कार्यालयाचे विभाजन करून प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीचे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयासाठी १० कोटी रुपये सरकारने दिले आहेत. याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत.