रतनलाल सी. बाफना यांचे निधन

71

जळगाव : शाकाहार सदाचारचे प्रणेता, स्वर्णनगरी जळगावचे नाव देशभर पोहचविणारे, सुवर्ण व्यावसायिक आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना (८६) यांचे सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बाफना यांच्या निधनामुळे जळगावातील व्यापार, उद्योग, सामाजिक क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले असून शेकडोंचा आधारवड हरपल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थमुळे बाफना यांच्यावर उपचार सुरू होते.

जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे बाफना यांनी विश्वास, सचोटी, पारदर्शकता या बळावर जळगावातील सोने देशभर पोहचविले.

संदर्भ व अधिक माहिती – dailyhunt आणि लोकमत