News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

राज्यात कोविड १९ च्या रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत आहे. काल ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार ६१  नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२८ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ४७ हजार ८२० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६१ लाख ३९ हजार ४९३ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३३ हजार ८४५ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७१ हजार ५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

भंडारा जिल्ह्यात एकही रुग्ण उपचाराधीन नाही. तर नंदुरबार जिल्ह्यात ८, आणि धुळे जिल्ह्यात सध्या फक्त दोन रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ७२ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १ टक्का एवढा आहे.