बात भारताच्या उन्नतीची..बात कश्मीरा पासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या विकसनशील ‘न्यू इंडिया’ची.. इंडिया वर्सेस भारत असा संघर्ष मोडून काढत सर्वांना विकासाच्या दखलपात्र वाटा खुल्या करुण देणाऱ्या अन् विश्वाच्या मानसपटलावर भारताची ऊंची वाढविणाऱ्या वैश्विक महानेत्याची बात अर्थात ‘मन की बात’! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऐतिहासिक अशी शंभरावी ‘मन की बात’ रविवारी, ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता देशवासियांना सांगणार आहेत. त्यानिमित्त, ठिकठिकाणी विविध लोकोपयोगी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांनी यामध्ये सक्रीय सहभागी होऊन देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे.

‘मन की बात’ हा आकाशवाणीवर प्रसारित करण्यात येणारा देशातील नव्हे तर जगभरातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील जनतेशी थेट संवाद साधतात. या कार्यक्रमाचे पहिले प्रसारण ३ ऑक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आले होते. ५२ बोलीभाषांमध्ये ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. ज्यामध्ये ११ विदेशी भाषांचा समावेश आहे. या कार्यक्रमाची वाढती लोकप्रिय लक्षात घेता अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा हे २७ जानेवारी २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झाले होते व भारतीय नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचे उत्तर दिले. देशातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांची व्यथा, प्रगतीचा आलेख, उद्योग व्यवसायाची होणारी भरभराटी, संघर्षाच्या करून काहण्या या माध्यमातून सांगितल्या जातात.

राष्ट्रनिर्माणासोबत चरित्र निर्माण करणे हा देखील या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. ‘सेल्फी विथ डॉटर’ या अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, देशासाठी बलिदान देणाऱ्या महानायकांना श्रद्धांजली देणे, ‘फिट इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून आरोग्य प्रती जागरूकता निर्माण करणे असे विविधांगी उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात. कोविड महामारीच्या काळात सर्व काही ठप्प असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या काळात देशाला केलेले मार्गदर्शन हे पाथदर्शी ठरले. संस्कृती, लोकपरंपरा, भाषा, लोककथा, सण-उत्सव इत्यादी बाबी या देशाच्या मुख्य प्रवाहात नव्हत्या. त्याची ओळख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला सर्वप्रथम करून दिली. विकासाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेल्या देशातील तमाम नागरिकांना त्यांनी या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.

‘मन की बात’ या कार्यक्रमातून होणारा संवाद, यामुळे राष्ट्राच्या पुनर्नमानाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली. मनन आणि चिंतन करण्याच्या दृष्टिकोनाला चालना मिळाली. देशात क्रांती घडवून आणण्यासाठी आवाज नसलेल्या समुदायाचा आवाज होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशाची बात सांगतात. उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी या कार्यक्रमाचा मोठा उपयोग होत असल्याने जगभरातील अनेक नागरिक ‘मन की बात’ या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या सर्वांचा आवडता असा ‘मन की बात’ कार्यक्रम आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून नक्की ऐकावा.

सकारात्मक बाबींवर दृष्टिक्षेप

जगभरातील अनेक नागरिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्राच्या विकासासाठी पुढे येण्याची तयारी दर्शवली आहे. ६० टक्के नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. ५५ टक्के नागरिकांनी देशाच्या प्रती कर्तव्य तत्परतेची भावना व्यक्त केली आहे. ६३ टक्के नागरिक सरकारच्या प्रती सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहेत. सरकारवरील विश्वास वाढत असल्याची बाब देशातील ५९ टक्के नागरिकांनी बोलून दाखविली आहे. ५८ टक्के नागरिकांच्या जीवनात ऐतिहासिक बदल घडला आहे. ७३ टक्के नागरिक सरकारच्या कामावर तसेच देशाच्या प्रगतीवर समाधानी असल्याचेही सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

हे ठरले लोकप्रिय विषय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत ९९ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशासोबत संवाद साधला आहे. शंभरावी ऐतिहासिक अशी ‘मन की बात’ कार्यक्रम ३० एप्रिल रोजी होणार आहे. आतापर्यंतच्या या कार्यक्रमांमध्ये देशाची वैज्ञानिक यशस्विता, सामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित असलेले विषय, सशस्त्र दलांची वीरता, युवकांचे विविध विषय, पर्यावरण आणि प्राकृतिक संसाधना संदर्भातील विषय देशातील जनतेला सर्वाधिक भावले असल्याचा अहवाल आहे.

– खासदार डॉ. अनिल बोंडे,

राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र