point nemo

नमस्कार वाचकहो आज आपण पॉइंट निमो (point nemo) म्हणजेच निकामी झालेले कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर (satellite graveyard) ज्या ठिकाणी पाडले जातात ती जागा, ह्याविषयी माहिती या लेखात बघणार आहोत.

प्रतीकात्मक छायाचित्र (pixabay)

दक्षिण पॅसिफिक महासागराच्या खोलवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक बिंदू आहे, जो सर्व बाजूनी जमिनीपासून दूर आहे. या ठिकाणाला पॉइंट निमो (point nemo) म्हणून ओळखले जाते. साधारण हे ठिकाण भूभागापासून अंदाजे 2,688 किलोमीटर (1,450 नॉटिकल मैल) अंतरावर आहे, ज्यामुळे ते ग्रहावरील सर्वात दुर्गम आणि वेगळे ठिकाण बनले आहे. “निमो” हा एक लॅटिन भाषेतील शब्द आहे त्याचा अर्थ आहे “कोणीही नाही”. हे स्थान स्थान इतके दुर्गम आहे की कोणत्याही दिशेने हजारो मैलांच्या आत कोणीही मानव नाही. म्हणून पॉइंट निमो (point nemo) दुर्गम असल्यामुळे निकामी झालेले कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर पाडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आंतरराष्ट्रीय अंतराळ समुदायाने या ठिकाणाला “अंतरिक्ष यान स्मशानभूमी” म्हणून नामकरण केले आहे. कक्षेबाहेर पडणारे उपग्रह आणि इतर अवकाशातील कचरा अनेकदा पॉइंट निमोकडे निर्देशित केले जातात जेणेकरून त्यामुळे लोकसंख्येच्या क्षेत्राला इजा न होता सुरक्षितपणे समुद्रात कोसळू शकतील.

या ठिकाणी आत्तापर्यंत अनेक अवकाश याने, जुने स्पेस स्टेशन्स समुद्राच्या तळाशी पडलेले आहेत. पॉइंट निमोचा शोध १९९२ मध्ये Hrvoje Lukatela नावाच्या सर्वे इंजिनीअरने लावला होता. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सजीव शक्यतो आढळत नाही मग तो मानव असो किंवा समुद्री जीवजंतू किंवा वनस्पती. त्यामुळे या जागेचा वापर निकामी झालेले कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर पाडण्यासाठी होतो. या ठिकाणी एका रिपोर्टनुसार १०० पेक्षा अधिक उपग्रह कचरा हजारो मैलांपर्यंत पसरलेला आहे.

पॉइंट निमो समुद्राच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणावर कोणत्याही देशाचा अधिकार नाही. हे ठिकाण दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलैंड यांच्या मध्यभागी आहे.

येथे सागरी प्राण्यांचा फारसा मागमूसही नाही. एका अंदाजानुसार सुमारे 200-400 अंतराळ उपग्रहांचा मलबा येथे पडला आहे. जेव्हा उपग्रह अवकाशातून पडतात तेव्हा नॅनो उपग्रह आकाशात पूर्णपणे जळतात. पण मोठे उपग्रह पूर्णपणे जळत नाहीत. अर्धवट जळल्यानंतर ती समुद्राच्या कुशीत गाडली जाते. आतापर्यंत, पॉइंट निमोसमधील सर्वात जड रशियन प्रयोगशाळा 2001 मध्ये अवकाशातून पडली होती.