महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा मोठ्या प्रमाणावर सापडू लागल्यामुळे आज 21 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की वर्षभरापूर्वी कोरोना विषाणू सापडला.

नशीब आत्ता आपल्या हातात कोरोना प्रतिबंधक लस आली. लसीबद्दलचे गैरसमज दूर झाले पाहिजे. लवकरच आणखी लसी बाजारात येणार आहे. सुरुवातीला कोरोना योद्ध्यांसाठी लसीकरण सुरू आहे, लवकरच जनतेसाठीही लसीकरण कार्यक्रम जाहीर होईल.

मास्क ही ढाल आहे, मास्क हे अनिवार्यच आहे. मास्क न घातल्यास मोठा धोका. शिस्तीचे पालन करणे गरजेचे. जनतेने गर्दी करणे टाळावे.

कुठेही सुट देऊन चालणार नाही. विना मास्क असेल तर दंड करायला सुरुवात झालीये. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार.

आज राज्यात साधारणतः 7000 नवीन रुग्णांची भर. कोव्हीडयोद्ध्यांच्या मेहनतीवर पाणी फिरता कामा नये. त्यांनी जे युद्ध लढले त्यांच्या बलिदानाची जाणीव जनतेने ठेवावी.

नाईलाजानं पुन्हा एकदा बंधनं घालतो आहे. उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक, मोठ्या यात्रा, गर्दी होणारे कार्यक्रम यावर काही दिवसांसाठी बंदी घालत आहे.

एक नवीन मोहीम “मी जबाबदार”. आपणच जबाबदार होऊन काळजी घ्यावी, हात धुणे, सामाजिक अंतर, मास्क हे सर्व पाळले पाहिजे.

पुढचे आठ ते दहा दिवसांमध्ये लॉकडाऊन करायचा का? यावर निर्णय घेणार. जनतेनेच याच उत्तर द्या. मास्क घाला, लॉकडाऊन टाळा. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय.