कर्नाटकात आज मतदान

2

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्व 224 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल.

एकूण 5.31 कोटी मतदार 2,615 उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरवणार आहेत. निवडणूक बंदोबस्तावर दोन लाखांहून पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. राज्यभरातील एकूण ५८ हजार ५४५ मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात आली आहे. तर, मतदानादरम्यान एकूण ७५ हजार ६०३ बॅलेट युनिट (BU), ७० हजार ३०० कंट्रोल युनिट (CU) आणि ७६ हजार २०२ व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.