मुंबई पॉवर कट, एक घातपातच होता – ऊर्जामंत्री

77

मुंबई: मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका प्रसिद्ध दैनिकानं केला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘तो घातपातच होता’, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज जाहीर करण्यात येणार आहे.

मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका रुग्णालये, शेअर बाजार व अन्य सेवांना बसला होता. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे काही घातपाताचा संशय असावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळं ही शक्यता खरी ठरली आहे. त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात होता. गलवान खोऱ्यातील संघर्षाची किनार या घातपातास होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.