1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण

65

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे आढळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे देशातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. यावर केंद्र सरकारने मोठा निर्यण घेतला असून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी 45 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती.

1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळेल.