पुणे – पुण्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या 17 वर्षीय मुलाच्या वडिलांना 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री आरोपी अल्पवयीन मुलाला त्याच्यासह रात्री 9.30 ते पहाटे 1 च्या दरम्यान मित्र दोन बार मध्ये गेले आणि कथितरित्या दारू प्यायली. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना 21 मे रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली होती.
तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला आज (22 मे) कडेकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
त्याच्याविरुद्ध बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पुणे उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील कोसी बार आणि ब्लॅक बार सील करून निर्णायक कारवाई केली. अपघातापूर्वी या दोन्ही आस्थापनांनी अल्पवयीन व्यक्तीला दारू दिली होती. बारच्या व्यवस्थापकांनाही पोलिसांनी अटक केली. एका बारचा मालक असल्याचे सांगणाऱ्या आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाई फेक करण्यात आली. पुण्यातील वंदे मातरम् संघटनेच्या ५ते ८ कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला. याप्रकरणी पोलिसांनी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. विशालवर आधीपासून गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.