News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दुपारी एक वाजेपासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन  पाहता येणार असून बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विभागनिहाय निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.  निकालात कोकण विभागाने ९१.५१ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९४.७१ टक्के, पुणे विभाग ९४.४४ टक्के, लातूर ९२.३६ टक्के, कोल्हापूर ९४.२४ टक्के, अमरावती ९३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के, नागपूर ९३.१२ टक्के, मुंबई ९१.९५ टक्के इतका लागला आहे. यात ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० टक्के इतकी आहे.