News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांचे सदस्यत्व कायम ठेवले आहे. शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे आपण हे निर्णय केल्याचे नार्वेकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढून टाकण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. हा अधिकार फक्त पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आहे.

अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, 3 गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. पक्षाची घटना काय सांगते, नेतृत्व कोणाकडे होते, विधिमंडळात कोणाचे बहुमत होते. 2018 साली शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार झालेल्या नियुक्त्याही डोळ्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत. 2018 साली दोन्ही पक्षांना पक्ष घटनेत बदल झाल्याची माहिती होती.