नाशिक मनपा गंगापूर धरणातील मृतसाठा उचलणार

5

नाशिक – या वर्षी महापालिकेला पाणी मागणीपेक्षा कमी मिळाल्याने नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट कायम असले तरी मनपा प्रशासन प्रयत्न करुन गंगापूर धरणातील मृतसाठा उचलण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी धरणामध्ये चर खोदण्यासाठी मनपाने शासनाकडे पत्रव्यहार सुरू केला असून त्याचा पुरेपूर पाठपुरावा करण्यात आला आहे, समजा त्याची परवागी मिळाली नाही तर धरणातून पंपिंगद्वारे मृतसाठा उचण्याची मनपाची तयारी आहे.

🛜 सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… https://thalaknews.com/join-our-group

नाशिकमधील गंगापूर व दारणा जलसमूहातून समन्यायी पाणी वाटप निर्णयानुसार मराठवाडयातील जायकवाडीसाठी तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. नाशिक शहराला वर्षभरासाठी ५८०० दलघफू पाणी आरक्षणाची गरज असताना जलसंपदाने ५३०० दलघफू पाणी मंजूर केले. ३१ जुलैपर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी ५०० दलघफू पाण्याची कमतरता होती.

त्यासाठी जलसंपदा विभागाला गंगापूर धरण मृत साठ्यातील सहाशे दलघफू पाणी उचलण्यास परवानगी दिली. परंतू ठराविक स्थिति नंतर पाण्याची पातळी कमी झाल्यास जॅकवेलपर्यंत पाणी पोहचत नाही. म्हणून मृत जलसाठा वापरण्यासाठी मनपा पाणी पुरवठा विभागाने धरणात चर खोदण्यापूर्वी सर्वेक्षणासाठी काढलेल्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली. या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता पाहता वेळे पडल्यास पंपिंगद्वारे पाणी पंप करुन जॅकवेलपर्यंत नेले जाईल.