News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई, दि. ५ : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे.

त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. १५ जून २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.