News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

भोपाळ (मध्यप्रदेश) – इस्लामचा तिहेरी तलाकशी काहीही संबंध नाही. त्याला पाठिंबा देणारे मतांसाठी राजकारण करत आहेत. एक घर दोन कायद्यांवर चालू शकत नाही. भाजप समान नागरी कायद्याविषयी संभ्रम भाजप दूर करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी येथे केले. येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून त्यांनी देशातील ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी बिहारमध्ये झालेल्या देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीवरही टीका केली. ‘या सर्व पक्षांच्या घोटाळ्यांचा आकडा एकत्र केला, तर २० लाख कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची निश्‍चिती आहे’ असा दावा त्यांनी केला.

या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘माझे बूथ, सर्वांत मजबूत’ या भाजपच्या मोहिमेअंतर्गत ५४३ लोकसभा आणि मध्यप्रदेशातील ६४ सहस्र १०० बूथच्या १० लाख कार्यकर्त्यांना डिजिटल पद्धतीने संबोधित केले. सर्व राज्यांतील विधानसभा मतदारसंघातील ३ सहस्र कार्यकर्तेही येथे उपस्थित होते