News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई – मुंबईमध्‍ये प्रत्‍येक मासाला सरासरी ५२ मॅनहोल्‍सवरील झाकणांची चोरी होते. मागील ४ वर्षांत मुंबईतून एकूण २ सहस्र ५३१ मॅनहोल्‍सची लोखंडी झाकणे चोरीला गेली आहेत, अशी लेखी माहिती राज्‍यशासनाकडून विधानसभेतील एका तारांकित प्रश्‍नांवर लिखीत स्‍वरूपात दिली आहे.

मॅनहोल्‍समध्‍ये पडून मागील काही वर्षांत मुंबईमध्‍ये काही नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. यातून मुंबईतील मॅनहोल्‍सवरील झाकणांच्‍या चोर्‍यांची गंभीर स्‍थिती पहाता सरकारने या चोर्‍यांकडे गांभीर्याने पहाणे आवश्‍यक आहे.

मुंबईमध्‍ये मलनि:सारण वाहिन्‍यांवर एकूण ७४ सहस्र ६८२ मॅनहोल्‍स आहेत, तर पर्जन्‍य जलवाहिन्‍यांवर २५ सहस्र ५९३ मॅनहोल्‍स आहेत, असे तारांकित प्रश्‍नावरील लेखी उत्तरात म्‍हटले आहे. आमदार पराग शाह यांनी विधानसभेत याविषयीचा तारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.