केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी २९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान सूर्यघर (Suryaghar) मोफत वीज योजनेला मंजुरी दिली. या योजनेंतर्गत १ कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयांची माहिती दिली. अनुराग ठाकूर म्हणाले की, या अंतर्गत रूफ टॉप सोलर पॅनल बसवणाऱ्या कुटुंबांना १५ हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू केली.
या योजनेत प्रत्येक कुटुंबासाठी 2 KW सौरऊर्जा प्रकल्पाच्या किमतीच्या ६०% रक्कम अनुदानाच्या स्वरूपात खात्यात येईल. जर एखाद्याला ३ KW चा प्लांट लावायचा असेल, तर १ KW
अतिरिक्त प्लांटवर ४०% सबसिडी मिळेल. सरकारने या योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे. तुम्ही पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकता. येथे तुम्हाला येथे तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक, नाव, पत्ता आणि तुम्हाला किती क्षमतेचा प्लांट उभारायचा आहे, यासारखी माहिती भरावी लागेल.









