News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सुरक्षेचे कारण देत ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर अनिश्‍चित काळासाठी बंदी घातली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांआधीच एक्सवर बंदी घालण्यात आली होती. आज पाकिस्तान सरकारने याबाबत अधिकृतरित्या घोषणा केली. सरकारने सिंध उच्च न्यायालयात एक्सवर बंदी घालण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.