News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना थेट मंदिरात जाता यावे, यासाठी बहुमजली वाहनतळापासून मंदिराच्या पूर्व दरवाजापर्यंत ‘स्कायवॉक’साठी चाचपणी करण्यात आली. देवस्थान संस्थान हे नियोजन करत असून यासाठी वास्तूविशारद एजन्सीचीही नेमणूक करण्यात आली आहे. ‘स्कायवॉक’ उभारतांना नागरिकांच्या घरांना अडचण येणार नाही, हे लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाप्रमाणे फॅब्रिकेटेड मार्ग उभारण्यात येणार आहेत, असे मंदिराचे विश्वस्त आणि माजी नगराध्यक्ष कैलास घुले यांनी सांगितले.