News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

ब्रिटन लवकरच अँटी कोविड स्प्रे बाजारात आणत असून हा स्प्रे नाकात मारला की ४८ तास कोविड पासून संरक्षण मिळू शकणार आहे असा दावा केला जात आहे. या स्प्रे मध्ये वापरल्या गेलेल्या रसायनांमुळे करोना विषाणूची मानवी पेशींना चिकटून बसण्याची क्षमता कमजोर होते. बर्मिघम विद्यापीठाने हा स्प्रे तयार केला आहे.

हा स्प्रे हायरिस्क झोन मधील लोकांना अतिशय उपयुक्त ठरेल. आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, फ्लाईट, क्लास कर्मचारी याना त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. डॉ. रिचर्ड मोएक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्प्रे मध्ये कॅरेगीनेन, गॅलेन या रसायनांचा वापर केला गेला असून त्यामुळे स्प्रेला दाटपणा येतो. ही रसायने माणसासाठी सुरक्षित असून त्यांचा वापर अन्न औषधात केला जातो.

या रसायनांच्या वापराला परवानगी दिली गेली आहे.

हा स्प्रे नाकात गेला की एक लेअर तयार होते आणि करोना विषाणू नाकात गेला तर त्याला घेरते. यामुळे शिंक अथवा अन्य प्रकाराने विषाणू नाकाबाहेर टाकला जातो. तो बाहेर न पडता गिळला गेला तरी त्यामुळे शरीराला नुकसान होत नाही. अर्थात स्प्रे वापरला गेला तरी मास्क लावणे, सॅनिटायझर वापर, सोशल डीस्टन्सिंग यांचे पालन करावे लागणारच आहे कारण कोविड विषाणू तोंड आणि डोळ्यातून सुद्धा शरीरात प्रवेश करू शकतो.

संदर्भ व अधिक माहिती – dailyhunt