Home Science Technology China Moon Mission : चंद्राच्या सर्वांत गडद भागात चीनचे यान उतरले

China Moon Mission : चंद्राच्या सर्वांत गडद भागात चीनचे यान उतरले

6
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

बीजिंग (चीन) – चीनने प्रक्षेपित केलेले यान चंद्राच्या गडद बाजूला यशस्वीपणे उतरले आहे. ‘चांगई-६’ असे या लँडरचे नाव आहे. याद्वारे चीन चंद्राच्या गडद बाजूला यान उतरवून तेथून नमुने गोळा करणारा पहिला देश ठरणार आहे. आता हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्यास आरंभ करेल. जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले, तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून २ किलो नमुने आणेल. नमुने गोळा करण्यासाठी, लँडरमध्ये ड्रिल आणि खोदण्यासाठी आणि नंतर ढिगारा उचलण्यासाठी यांत्रिक हात बसवण्यात आले आहेत. ‘चांगई-६’ च्या यशामुळे चीन चंद्रावर तळ बांधण्यात अमेरिका आणि इतर देशांना मागे टाकू शकतो.

वर्ष २०३० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. दुसरीकडे वर्ष २०२६ पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे प्रयत्न अमेरिका करत आहे. चीनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन तळ उभारायचा आहे. यापूर्वी वर्ष २०२० मध्ये चीनचे ‘चांगई-५’ हे लँडरही चंद्रावर उतरले होते. त्याने चंद्रावरून १.७ किलो नमुने आणले होते. चीन आणखी ३ चंद्र मोहिमांच्या सिद्धतेत आहे. याद्वारे चंद्रावर पाण्याचा शोध लावला जाईल आणि कायमस्वरूपी तळ बांधला जाईल.