News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

कोरोनाचा संसर्ग झाला नाही, असे ठिकाण सापडणे शक्य नाही; मात्र देशी गायींच्या सहवासात राहिल्याने कोरोनाच्या संसर्गापासून लांब रहाता येते. पुणे महानगर गोसेवा समितीच्या वतीने राज्यातील ३०० गोशाळांच्या केलेल्या पहाणीत यातील निष्कर्ष समोर आले आहेत, अशी माहिती पुणे महानगर गोसेवा समितीचे (कसबा भाग) सहसंयोजक श्री. निरंजन गोळे यांनी दिली.

देशी गायींच्या सहवासात असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग अल्प होत असल्याचे लक्षात आले. त्यासाठी १८ वेगवेगळ्या प्रश्नावलींच्या माध्यमातून राज्यातील ३०० गोशाळांमधून विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले. यातील बहुतांश लोकांनी कोरोनाचा त्रास झाला नसल्याचे सांगितले. त्याचे शास्त्रीय परिणाम पडताळण्यात आले

समितीच्या कसबा भागाचे संयोजक श्री. गिरीष वैकर म्हणाले, ‘‘एकूण ३०० गोशाळांपैकी २९२ गोशाळांमध्ये काम करणार्‍या एकालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे लक्षात आले. यातील अनेकजण कामाच्या निमित्ताने बाहेर येणे-जाणे करत होते. गोशाळांच्या आसपासच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग होता. ८ गोशाळांनी त्यांच्याकडे काम करणार्‍या १ किंवा २ कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले.

या ३०० गोशाळांमध्ये दैनंदिन देशी गायींच्या संपर्कात असणार्‍या एकूण १ सहस्र ८९५ व्यक्ती होत्या. त्यांपैकी १ सहस्र ८८१ लोकांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे लक्षात आले. देशी गायींच्या संपर्कात असलेल्या ९९.२७ टक्के व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला नाही.’’

देशात आणि परदेशात गोमूत्रावर मोठे संशोधन झाले आहे. आपल्या देशाला या संशोधनात देशी आणि अमेरिकन अशी ६ पेटंट मिळालेली आहेत. गोमूत्रामध्ये ‘अँटिबायोटिक’, ‘अँटीफंगल’, ‘बायो एन्हान्सर’, ‘अँटी मायक्रोबायल’, ‘इम्यून एन्हान्सर’, ‘अँटिकॅन्सर’ ही विशेष तत्त्वे असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गोशाळेत या लोकांचा दररोज गोमय आणि गोमुत्राशी संपर्क येतो. गोमूत्रामध्ये ‘व्होलाटाईल ऑर्गेनिक’ आणि ‘फेनॉलिक कंपाऊंड’ असल्यामुळे ते ‘अँटीव्हायरल डीसइन्फेक्टन्ट’ तसेच ‘सॅनिटायझर’ म्हणून काम करत असावेत. त्यामुळेच ९९ टक्क्यांपेक्षा अधिकजण या कारोनाच्या संसर्गापासून वंचित राहिल्याची शक्यता आहे, असे मत पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांनी व्यक्त केले.

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात 28 june 2021