दीप अमावास्येचे महत्व जाणा (२८.७.२०२२) आणि त्या दिवसाला गटारी अमावास्या म्हणू नका ! 🪔

30

दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करत आहेत. मुळात गटारी असा काही सण आपल्या धर्मात नाही.

आषाढ अमावस्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण मास चालू होत असल्याने आणि हा पवित्र मास मानला जात असल्याने असंख्य जण त्या काळात मांसाहर वर्ज्य करतात. काही जणांना पुढे महिनाभर, तर काही जणांना चातुर्मास संपेपर्यंत मांसाहर करायला मिळणार नसल्यामुळे गटारी अमावास्येच्या दिवशी दारू आणि मांसाहर यांचे सेवन केले जाते.

या कुप्रथेचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात येते. या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण ! त्यामुळे या सणाला दीप अमावास्याच म्हणावे, अगदी चेष्टेने सुद्धा गटारी म्हणू नका.

वास्तविक आषाढ मासातील अमावस्येला मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. कारण –

१. या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.

२. हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली, तर सर्व निसर्गचक्रावरच विपरित परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

३. बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजवतांना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणार्‍याला त्रास होऊ शकतो.

४. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.

या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण !

त्यामुळे या सणाला दीप अमावास्याच म्हणावे, अगदी चेष्टेने सुद्धा गटारी म्हणू नका. कोणीही या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात.

आजही या दिवशी महाराष्ट्र्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिट्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप-अमावास्या आपण सर्वांनी उत्साहात साजरी करूया आणी आपली संस्कृती जपुया.

संदर्भ – https://www.sanatan.org/mr/a/31389.html