आपत्काळासाठी सज्ज व्हा !

93

जीवघेण्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जनतेने आता दैनंदिन जीवनातील मनोरंजनासारख्या काही गोष्टींतूनही सीमोल्लंघन करण्याची वेळ आली आहे. नाही तर ‘फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी निरो फिडल वाजवत होता’, तशी गत होईल. कोरोना महामारीने आपत्काळाची पहिली झलक दाखवून सर्वांची झोप उडवली. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर याचा प्रभाव पडला. हा पहिला टप्पा आहे; पण ‘परिस्थितीचे गांभीर्य जनतेच्या लक्षात आले’, असे म्हणावे तेवढे झाले नाही. कुणी खाद्यपदार्थ बनवण्यात, तर कुणी समाजमाध्यमांवर मनोरंजन करण्यात हा वेळ घालवला. ‘पुढील वर्षी जगातील सर्व लोक तोंडाला पट्टया बांधून फिरतील’, असे कुणी मागील वर्षी म्हटले असते, तर कुणालाही ते खरे वाटले नसते. यावरून तरी संतवचनांवर श्रद्धा ठेवून त्यांचे आज्ञापालन केले पाहिजे. गेल्या २० वर्षांत जगासह भारतात आतंकवादाने कहर केला. गेल्या १० वर्षांत भारतासारख्या आध्यात्मिक देशात सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसारखी भयावह गोष्ट घडली. गेल्या ५ वर्षांत जगभरात आग, दुष्काळ, वादळे, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनी कहर केला. येणारे युद्ध हे लुटूपुटूचे नाही. त्याला तोंड देण्यासाठी नटणे-मुरडणे, गप्पा-टप्पा, मेजवान्या आणि सामाजिक माध्यमांवरील मनोरंजन उपयोगी पडणार नाही कि विकास, हेवेदावे, द्वेष, मत्सर अन् स्पर्धा ! तंत्रज्ञानाचा परमोच्च विकासही युद्धहानी रोखू शकणार नाही. त्यासाठी आत्मिक बळ लागणार आहे. ते देवाला आळवून, त्याला याचना करून, त्याला शरण जाऊन, म्हणजेच त्याचे भक्त बनूनच मिळणार आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी प्रथमोपचार, अग्नीशमन यंत्रणा, पाण्याची आणि धान्याची व्यवस्था करणे, वाहने आणि संपर्क यांची व्यवस्था करणे, हे एक मोठे आव्हान असणार आहे. कालचक्र गती घेत आहे. या गतीला आपली गती जुळवणे आवश्यक आहे. आपत्कालाची विविध स्तरांवर पूर्वसिद्धता करणे, हे आपत्काळात तरून जाण्याचे एक माध्यम आहे. प्रत्येकाजवळचे ‘कौशल्य’ आपत्काळासाठी वापरणे, हे त्याचे आपत्काळात तरून जाण्याचे ‘शस्त्र’ ठरणार आहे. दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर रामकृष्णादी अवतारांच्या पराक्रमाच्या विजयगाथांचे स्मरण करण्यासमवेत आता त्यांचा आदर्श समोर ठेवून कृती करण्याची, म्हणजे ‘दशहरा’ हे अर्थपूर्ण नाव सार्थ करण्याची वेळ आता आली आहे. हिंदूंनो, त्यासाठी संघटन आणि भक्ती ही शस्त्रे पाजळून घेण्याची घडी आता साक्षात् अवतरली आहे. वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर ‘अधर्म’ म्हणून या जगात जे जे काही आहे, त्याला निर्धोकपणे स्वतःचे आणि समाजाचे शत्रू समजून त्यापासून दूर रहाणे अन् प्रसंगी बचावासाठी त्यावर कुरघोडी करणे, हेच खरे काळाच्या कसोटीवर उतरणारे ठरणार आहे. यंदाच्या दसर्‍याचे सीमोल्लंघन त्याचसाठी आहे !

संदर्भ – सदर लेख दैनिक सनातन प्रभात मधून घेतलेला आहे.