पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का

77

ठाणे – पालघर जिल्हातील तलासरी तालुका पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. ९ नोव्हेंबर या दिवशी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास झारीगाव येथे ५ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तर दुपारी ४ वाजून १७ मिनिटांनी याच तालुक्यातील बारादी परिसरात ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.

या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे पालघर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.