निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांची शरद पवारांना (Sharad Pawar) विनंती.

7

शरद पवारांचं (Autobiography) आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. “संघटनेबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं पवार यांनी सांगितलं.

परंतु त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. मुंबईतील वाय बी सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मा. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. आपापल्या जागेवर बसण्याचं आवाहन केले

दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.