नाशिक – नाशकात पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून दुचाकी चालकाने हेल्मेट परिधान केलेले नसल्यास त्याला शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात आदेश काढला आहे.

१५ ऑगस्टपासून नाशिक शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम राबवली जाणार आहे. मात्र यासंदर्भात पेट्रोलपंप चालकांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. हेल्मेटसक्तीबाबत नाशिककरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहे. याआधी शहरात हेल्मेटसक्ती लागू करण्याचा प्रयत्न झाला होता पण त्याला मोठा विरोध झाला. त्यानंतर काही दिवसांनी ही मोहीमही बारळगली. मात्र आता पुन्हा हेल्मेटसक्ती होणार असून हेल्मेट नसल्यास पेट्रोल मिळणार नसल्याने हा हेल्मेटसक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

पेट्रोलपंप चालक या मोहिमेला किती प्रतिसाद देतात, त्यासोबतच पेट्रोलपंपावर हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वराला पेट्रोल खरंच मिळेल की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरेल.