News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीच्या मंगल पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी, असे आवाहन करतो. दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब व उपेक्षित व्यक्तीला सामावून घेतल्यास ही दिवाळी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल. हा प्रकाशोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

संदर्भ व अधिक माहिती – महासंवाद