Home Corona COVID-19 COVID19 लशींची मागणी नोंदवणाऱ्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

COVID19 लशींची मागणी नोंदवणाऱ्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

59

वॉशिंग्टन: जगभरात करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी संपूर्ण जगात विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे लस विकसित करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र आहे. काही देशांनी लशींची आगाऊ नोंदणी केली असून भारतही यामध्ये मागे नसल्याचे समोर आले आहे. लशींची सर्वाधिक मागणी नोंदवणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.

करोनाला अटकाव करणाऱ्या काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर फायजर, मॉडर्ना यांनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी यशस्वी ठरली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष लशींकडे लागले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, करोना लस खरेदीसाठी आगाऊ नोंदणी करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर युरोपीयन युनियन आहे. ड्युक विद्यापीठाच्याा लाँच अॅण्ड स्केल स्पीडोमीटर इनिशिटीव्ह अहवालाच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे.

संदर्भ व अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स