chandrayaan launch

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) (ISRO) जुलै मासामध्ये ‘चंद्रयान-३’ (Chandrayaan-3) प्रक्षेपित करणार आहे. जर हे प्रक्षेपण यशस्वी झाले, तर भारत असे करणारा चौथा देश बनेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने त्यांचे अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे. ‘चंद्रयान-२’ २२ जुलै २०१९ या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले होते. ७ सप्टेंबर २०१९ या दिवशी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात असतांना खाली पडले होते.

इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-२ मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो. प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतोच, असे नाही; पण त्यातून शिकून पुढे जायला हवे. अपयश आले; म्हणून आपण प्रयत्न करणे सोडून देऊ नये. चंद्रयान-३ मोहिमेतून आपल्याला पुष्कळ काही शिकायला मिळेल आणि आपण इतिहास घडवू.

चंद्रयान-३