News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई – राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे. यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाला असून ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार आहे. आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आज राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये सिनेमा आणि नाट्यगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं आणि हॉटेल्सही 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्पा आणि स्पोर्टसही या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पर्यटन स्थळं, हॉटेल्स, बार, स्पा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन मैदाने तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात. सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात, असं या नियमावलीत म्हटलं आहे. शासनाने, या जिल्ह्यातील 90 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर 70 टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे. म्हणून ए श्रेणीमध्ये टाकलेले आहे.