News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुचर्चित ठरलेल्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या नावात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाच्या नावावरुन वाद सुरु होता. मात्र, आता या चित्रपटाचं नाव बदलून ‘लक्ष्मी’ इतकंच ठेवण्यात आलं आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता. तसंच श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला होता.

हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं . त्याचप्रमाणे या नावात बदल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.