trimbakeshwar Jyotirlinga Temple

नाशिक – नाशिकमधून आलेल्या एका मोठ्या वृत्तानुसार, येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता एफआयआर दाखल केला आहे. याआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज म्हणजेच मंगळवारी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी गटाला मंदिरात जाण्यापासून रोखले होते. त्याचवेळी या घटनेनंतर मंदिर ट्रस्टने पोलिसांत तक्रार केली होती. खरे तर, गेल्या शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी विशिष्ट धर्माच्या लोकांचा मंदिर परिसरात घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला. मंदिर व्यवस्थापनानुसार, भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. याप्रकरणी मंदिर ट्रस्टने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यावर पोलिसांनी आता एफआयआर नोंदवला आहे.