‘बकरी ईद’ निमित्त लावलेल्या फलकावर नाशिकचा ‘गुलशनाबाद’ असा उल्लेख !

8

नाशिक – २९ जून या दिवशी बकरी ईदच्या निमित्ताने शहरात लावलेल्या फलकावर ‘मुहम्मद सुफिखान रजा फ्रेंड सर्कल गुलशनाबाद’ असा उल्लेख करण्यात आला आहे. नाशिक शहराचा उल्लेख ‘गुलशनाबाद’ असा केल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मोगलकाळात नाशिक शहराचे नाव ‘गुलशनाबाद’ होते. त्यानंतर पेशवाईच्या काळात ‘गुलशनाबाद’चे नामकरण ‘नाशिक’ असे करण्यात आले; मात्र त्यानंतर आता अचानक नाशिकचा उल्लेख ‘गुलशनाबाद’ करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक माध्यमांतून या कृतीचा निषेध नोंदवला जात आहे.

गुलशनाबाद’चा फलक लावणार्‍यांवर कारवाई करणार ! – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक –  ‘गुलशनाबाद’चा फलक लावणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन नाशिक जिल्ह्याचे दादा भुसे यांनी दिले. भुसे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाची बैठक ३० जून या दिवशी येथे पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, फलकाविषयीची गोष्ट माझ्याही कानावर आली असून पोलिसांशी बोलणार आहे. ही खोडसाळ प्रवृत्ती आहे.