Important Notification from the Central Election Commission
New Update regarding Graduation Elections teachers-graduates constituencies

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. 26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे. 

आधी 10 जून रोजी मतदान होणार, ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपुर्वीच या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर, शिक्षक कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. मुंबई पदवीधर सदस्य विलास पोतनीस, कोकण पदवीधर निरंजन डावखरे, नाशिक विभाग किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.