News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई, २५ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे चालू रहावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा. सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे २०२३ या दिवशी होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मॉरिशस येथे होणार्‍या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर

या सोहळ्याला मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती लाभणार असून महाराष्ट्रातून असंख्य सावरकरभक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशस येथे उपस्थित रहाणार आहेत. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक यांविषयी मंत्री चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे.