बागेश्‍वर धाममध्ये देशी पिस्तूल घेऊन घुसलेल्या रज्जन खान याला अटक !

5

छतरपूर (मध्यप्रदेश) – येथील बागेश्‍वर धाममध्ये अवैध शस्त्र घेऊन घुसलेल्या रज्जन खान या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ !

येथे काही भाविक प्रदक्षिणा घालत असतांना एक तरुण हातात देशी पिस्तूल घेतलेला दिला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस येथे आले असता त्यांना पाहून रज्जन खान पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. तो शिवपुरी येथील इंद्रपुरी संकुलात रहाणारा आहे. तो येथे का आला होता ?, याची चौकशी पोलीस करत आहेत. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी मध्यप्रदेश सरकारकडून ‘वाय’ श्रेणीची सुरक्षाव्यवस्था यापूर्वीच पुरवण्यात आलेली आहे.