हैती हादरले, 7.2 तीव्रतेचा भूकंप

41

हैती – शहर भूकंपाच्या मोठ्या धक्क्यानं हादरलं आहे. शनिवारी हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात तब्बल 304 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1800 हून जास्त लोकं जखमी झालेत. पंतप्रधान एरियल हेनरी यांनी सांगितलं की, या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एक महिन्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

हैती शहराच्या समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या भागाला भूकंपाचा हादरा बसला. 7.2 इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे उत्तर पूर्वमध्ये 12 किलोमीटर दूर संत लुइस दु सुडमध्ये आहे.