जालना : दिवाळी संपल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाटेची भीती यामुळे आणखी वाढत आहे. या परिस्थितीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावलं जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहेत. अशाने कोरोनाचा धोना पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा आहे. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याने राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

संदर्भ व अधिक माहिती – ए बी पी माझा