“या” राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी कोरोना चाचणी आवश्यक.

84

देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली, राजस्थान , गोवा आणि गुजरात या चार राज्यातून येणाऱ्या हवाई, रेल्वे व रस्ते प्रवाशांसाठी काही नियम लागू केले आहेत.

काय आहेत नियम
– दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे.
– महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी ही करोना चाचणी करावी लागेल.
– ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने कोरोना चाचणी करावी लागेल.
– चाचणीनंतर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल.
– ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.