शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार आहे, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या निर्णयाला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमस्थळीच ठिय्या मांडत या निर्णयाला विरोध केला. नेते आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांनी त्यागपत्र मागे घेण्याचे साकडे घातले; मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी २-३ दिवस द्या, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्ते शांत झाले, तरच हा फेरविचार करू, असा निरोपही त्यांनी अजित पवार यांच्याद्वारे कार्यकर्त्यांना पोचवला. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठ सुरु असल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार फेरविचार करतात कि नवीन अध्यक्ष निवडीची घोषणा करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. नवीन अध्यक्षांच्या बाबतीत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार हि नावे चर्चेत असल्याचे दिसत आहे. शरद पवारांनी पद सोडल्यानंतर नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन चार नावं प्रामुख्यानं घेतली जात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. पण यामध्ये सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात आहे. कारण त्यांचा देशपातळीवरील इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क तसेच संवाद उत्तम आहे.

राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष नेमलेली समिती निर्णय घेणार आहे.