नायगाव (ता. सिन्नर) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हुतात्मा वसंत लहाने सार्वजनिक वाचनालय, नायगाव येथे उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाचनालयाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मणराव सांगळे यांनी भूषवले, तर उपाध्यक्ष श्री. पांडुरंग कृष्णा जेजुरकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. महेंद्र राजाराम गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग विशद केले. “वाचनामुळे बाबासाहेब घडले,” असे सांगताना त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले आणि उपस्थितांना अंतर्मुख केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव श्री. रामदास कदम यांनी केले व त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास वाचनालयाचे कार्यकारी मंडळ, वाचक, ग्रामस्थ तसेच ग्रंथपाल श्री. रोशन भालराव, लिपिक मनीषा सानप आणि दीपिका उघडे उपस्थित होते.
