सातारा – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच खरे वाघ होते. त्यामुळे वाघ्या श्वानाविषयी इतिहासतज्ञांची समिती नेमून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
खासदार भोसले पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी भारतामध्ये राहून औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर टीका केली. “जे लोक औरंगजेबाचे स्टेटस ठेवतात, ते या देशात राहण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे,” असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.