राज्यातील शाळा १५ जूनला चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

10

मुंबई – राज्यातील शाळा १५ जून या दिवशी चालू होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, १३ जून या दिवशी केवळ पहिलीच्या शाळांसाठी ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम होणार आहे. राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळेच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. बारावीचा निकालही लवकरच लागेल.

या प्रसंगी वर्षा गायकवाड यांनी ‘महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्वजीवी प्रोग्राम’ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ‘महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’मध्ये विज्ञान शाखेत गणित विषय घेऊन ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एच्.सी.एल्. आस्थापनाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २० ते २५ सहस्र विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून संबंधित विद्यार्थ्यांना नोकरीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे उद्योजकतेच्या विषयीचे शिक्षण मिळावे, यासाठी ‘स्वजीवी उपक्रम’ सर्व सरकारी शाळांमध्ये चालू करण्यात येणार आहेत.