संयुक्त राष्ट्रांनी तुर्की प्रजासत्ताकची (तुर्कस्तानची) नाव पालटण्याची विनंती स्वीकारली आहे. तुर्कीचे संयुक्त राष्ट्रांत ‘तुर्किये’ असे नामकरण करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले, ‘तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेव्हतुल कावुसोग्लु यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून तुर्कीचे नाव पालटून ‘तुर्किये’ ठेवण्याची विनंती केली होती.’

तुर्कीचे राष्ट्रपती रेचीप तैयप एर्दोगन यांनी त्यांच्या देशवासियांना ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक भाषेत तुकीचे नाव ‘तुर्किये’ असे नाव वापरावे. तुर्किये नाव हे तुर्की लोकांची संस्कृती, सभ्यता आणि मूल्ये यांचे उत्तम प्रतिनिधित्व करते’, असे सांगितले होते. स्थानिक भाषेच्या नावानेच देश ओळखला जावा, असा समज रूढ झाल्याने काही देशांच्या नावांमध्ये पालट स्वीकारण्यात आले