News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हातात घेतलेल्या भोंग्याच्या विषयावरून राज्यातील वातावरणही काहीकाळ तापले. आता राज ठाकरे यांनी आपल्या मनसे सैनिकांना पत्र लिहले आहे. “मशिदीवरील भोंग्यांचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. आपला विचार लोकांपर्यंत पोहचायला हवा, लोकसहभागाशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही, माझं पत्र घराघरात पोहचवा,असे आदेश ठाकरे यांनी पत्रातून दिले आहेत.

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत कार्यकर्त्यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा, असे पत्रातून आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.