उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी पार

10

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी झाला. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी  मैदानावर झालेल्या  भव्य सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

विविध राज्यातले भाजपा कार्यकर्तेही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. आदित्यनाथ यांच्यासह केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह ५२ मंत्र्यांनीही पदाची शपथ घेतली. त्याआधी काल योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीनं एकूण ४०३ पैकी २७३  जागा जिंकून  गेल्या तीन दशकांमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा मान मिळवला आहे.