News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल ८५ लाख ४२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची संख्या ८० कोटी ४३ लाखाच्या वर गेली आहे. देशात काल कोविड-१९ चे ३८ हजार ९४५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी २६ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला  आहे. काल ३० हजार ७७३ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ३ लाख ३२ हजार आहे.